You are currently viewing विश्वभरारी फाऊंडेशनच्या वतीने ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

विश्वभरारी फाऊंडेशनच्या वतीने ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित ‘महानोरांचे साहित्य संचित’ ह्या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.‌ ना. धो. महानोर यांच्या साहित्यावर आधारित गाणी, कविता आठवणी आणि साहित्यिक योगदानाचे विवेचन असा भरगच्च कार्यक्रम सादर झाला.

विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमासाठी साठ्ये महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे मोठे सहकार्य लाभले. पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी महानोर यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. महानोर यांच्या अनेक आठवणी सांगून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू उलगडून दाखविले. सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी महानोर यांची सुप्रसिद्ध गाणी सादर करून महानोर यांच्या काव्यांची वैशिष्ट्य सांगितली. कार्यक्रमाचे समयोचित सूत्रसंचालन प्रा. समीर जाधव यांनी केले. प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी साठ्ये महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी अजंठा चित्रपटातील गाणी, किस्से सांगितले. तसेच महानोरांच्या भेटीगाठीतील संवाद आणि ह्रद्य आठवणींचा ठेवा उलगडला.

प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत महानोर यांच्या गाण्यांची काही वैशिष्ट्ये अधोरेखित केली. ना. धो. महानोर यांच्या शब्दांचे ऋण माझ्यावर आहे, त्यांची परतफेड कधीच करता येणार नाही. परंतु त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या कविता, गाणी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य मी समजते, असे लता गुठे यांनी मनोगतातून व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले.

 

सर्व मान्यवरांच्या सहभागाने आणि संदीप राऊत, सुवर्णा घैसास, स्मुग्धा माळी अशा गायक वृंदाने सादर केलेल्या महानोरांच्या गाण्यांनी कविवर्यांचे स्मरण आणि त्यांना वाहिलेली आदरांजली वेगळी ठरली. साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत संयोजन छान केले. डॉ. कृष्णा नाईक, प्रकाश राणे, गुरुनाथ तेंडुलकर, प्रशांत राऊत, अशोक शिंदे, संपदा पाडगावकर तसेच विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्तम दाद दिली. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महाविद्यालय विद्यार्थीही हजर होते.

 

————————————————————-

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा