You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सावंतवाडी तहसीलदारांच्या “ऑनफिल्ड” कार्यतत्परतेची दखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सावंतवाडी तहसीलदारांच्या “ऑनफिल्ड” कार्यतत्परतेची दखल

मनसे पदाधिकाऱ्यांनी केला श्रीधर पाटीलांचा सन्मान

सावंतवाडी

पुरसदृश्य व इतर आपत्कालीन कालावधीत रात्री बेरात्री स्वतः कर्मचाऱ्यांसोबत ऑनफिल्ड उपस्थिती दाखवणाऱ्या सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटीलांचा कार्यतत्परतेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेऊन मनसे शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला आहे. सावंतवाडी तालुक्यात पावसाने कहर करत संपूर्ण सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण होऊन प्रशासनाकडून आपत्ती प्रतिबंधात्मक उपाय योजना युद्ध पातळीवर करण्यात आल्या. याशिवाय आंबोली घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनांमध्ये तहसीलदार स्वतः स्पॉटवर पोहचून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आढावा घेत होते. सावंतवाडी मोती तलावात देखील स्वतः उतरलेले दिसून आले होते. सावंतवाडी तहसीलदार श्री श्रीधर पाटील कार्यालयाच्या चार भिंतीत बसून आदेश न देता व तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणून सर्व ठिकाणी ऑन फिल्ड जागता पहारा देत संपूर्ण तालुक्यात फिरून आढावा घेत होते. नैसर्गिक आपत्ती व पुरसदृश्य परिस्थिती सावंतवाडी तहसीलदार व सर्व प्रशासकीय यंत्रणेने नागरिकांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने हाताळल्याची दखल घेऊन माजी शहर अध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार आरोस माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक नंदू परब सुरेंद्र कोठावळे म.न.वि.से शहराध्यक्ष निलेश देसाई पिंट्या नाईक ज्ञानेश्वर नाईक संदेश सावंत स्वप्निल जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला व कामाचे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा