शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके हेच दुसऱ्यांना गंडा घालणारे – वैभव रावराणे

वैभववाडी

कोणालाही नोकरी लावतो असे सांगून मी पैसे घेतले नाहीत. लाखो रुपयांचा गंडा मी कोणाला घातला नाही. परंतु माझ्यावर आरोप करणारे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके हेच दुसऱ्यांना गंडा घालणे, टक्केवारीवर स्वतःचे दुकान चालवणे हे प्रताप करत आहेत. अशी टीका युवा सेना तालुका प्रमुख वैभव रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. मंगेश लोके यांचे सर्व कारनामे आपल्याला माहित आहेत. जर मी तोंड उघडलं तर महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंगेश लोके यांनी गुरुवारी वैभव रावराणे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले होते. अनेकांना गंडा घातल्याचा आरोप त्यांनी रावराणे यांच्या वर केला होता. मी माझा राजीनामा चार महिन्यापूर्वी खासदार विनायक राऊत व युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू यांच्याकडे दिला आहे. व मी चार महिने शिवसेना कार्यालयात कार्यालयात गेलो नाही. त्यामुळे हकालपट्टी करायचा व हाकलून देण्याचा विषयच नाही. खा. राऊत यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या जवळची माहिती मी खा. राऊत यांना सांगणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. गितेश कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास मी आचिर्णे येथे गेलो होतो. दरम्यान घरी परतत असताना मला मारण्याचा कट आखण्यात आला होता. असा गंभीर आरोप ही रावराणे यांनी पत्रकात केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =