सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस गेल्याचा थोडाफार त्रास झाला परंतु जिल्ह्यात अजूनही काँग्रेसला मानणारा मतदार आहे. परंतु त्यासाठी पळापळ करून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी येणार काळात आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज येथे दिली.
दरम्यान सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. मात्र, भाजपनेच पालकमंत्री बदलावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दीपक केसरकर हे कोल्हापूरला पर्यटनासाठी येत असल्याचं भाजपचं म्हणन आहे असा टोला कॉंग्रेस नेते आ. सतेज पाटील यांनी हाणला.
ते पुढे म्हणाले, कॉंग्रेस तळागाळात जिवंत आहे. भाजपसारखी टीशर्ट आणि बिल्ले लावून फिरायची सवय आम्हाला नाही. कॉंग्रेस निवडणूकांची वाट पाहत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. पण, भाजप निवडणूकांना घाबरत आहे. तर सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. मात्र, भाजपनेच पालकमंत्री बदलावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दीपक केसरकर हे कोल्हापूरला पर्यटनासाठी येत असल्याचं भाजपचं म्हणन आहे अस मत आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ नेते विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी,आदी उपस्थित होते.