You are currently viewing २७ मे पासून वेंगुर्ले शहरात २ दिवस आड पाणीपुरवठा

२७ मे पासून वेंगुर्ले शहरात २ दिवस आड पाणीपुरवठा

वेंगुर्ले :

 

२७ मे पासून वेंगुर्ले नगरपरिषद क्षेत्रातील शहरातील नळ कनेक्शन धारकांना होणारा पाणीपुरवठा २ दिवस आड करण्यात येणार आहे,असे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे.

वेंगुर्ले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावातील अस्तित्वातील पाणी साठा, हवामान, सध्याचे तापमान व लोकांची पाण्याची वाढती मागणी याचा विचार करता दि. २७ मे पासून पाणीपुरवठा २ दिवस आड करण्यात येणार आहे. सर्व नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून व योग्य प्रकारे वापर करावा व नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदरचा पाणीपुरवठा शनिवार २८ मे ऐवजी सोमवार ३० मे रोजी करण्यात येईल व नंतर २ दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येईल, असे न.प.च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा