जिल्हा आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी होणार बैठक – सांडव, गिरकर
मालवण
वीजबिलासंदर्भात मनसे मालवणची बैठक सोमवारी सकाळी ११.०० विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे
दिनांक २० रोजी च्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे जिल्हा आंदोलनाची रूपरेषा ठरविण्याबाबत सर्व तालुका अध्यक्षांनी सोमवार दिनांक २३.११.२०२० रोजी आपल्या तालुक्यामध्ये बैठक आयोजित करावी. सदर बैठकीमध्ये वीजबिलासंदर्भात जिल्हास्तरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत सामान्य जतनेलाही सहभागी करणेबाबत नियोजन करण्यात यावे. सदर मोर्चाचे आदेश मा.राज साहेब यांनी दिले आहेत.
सदर बैठकीस तालुकाध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, विद्यार्थी सेना, महिला आघाडी तसेच आजी-माजी महाराष्ट्र सैनिकांना सदर बैठकीस निमंत्रित करावे.अशा प्रकारच्या सुचना परशुराम उपरकर माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस यांनी दिल्या आहेत.
सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या विजबिलावर मालवण तालुका मनसेने गंभीर दखल घेतली आहे. तरी सर्व उपतालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष, विद्यार्थी सेना, महिला आघाडी तसेच आजी-माजी महाराष्ट्र सैनिकांनी सोमवार दिनांक २३.११.२०२० रोजी सकाळी ठिक ११.०० वा. उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष विनोद सांडव व तालुका सचिव विल्सन गिरकर यांनी केले आहे.