You are currently viewing पाऊस हवा सर्वांना

पाऊस हवा सर्वांना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस हवा सर्वांना.*

 

निरभ्र असते नभ

एकाएकी कोसळतो,

अंगाअंगाला स्पर्शूनी

मनात सळसळतो..।

 

थंड होऊनी जातात

क्षणार्धात उष्णवारे,

निसर्गप्रेमी होतात

नित्य त्याशी भांडणारे..।

 

प्रसन्नशी जाणवते

प्रत्येकाची हालचाल,

विजेच्या कडाडन्याला

घाबरे बालगोपाल..।

 

काहीवेळ का असेना

जीवन वाटते रम्य,

निरस या जगामध्ये

मनास भासते गम्य..।

 

सुखावती या धारांनी

प्रेमिका आणिक प्रेमी,

स्वप्नी होई येणे जाणे

रोमांचती रोमरोमी..।

 

संकटात सापडतो

कधीकधी शेतकरी,

पाऊस हवा सर्वांना

कसाही असला तरी..।

 

 

✍🏻 *कवयित्री अख़्तर पठाण.*

*(नासिक रोड)नाशिक*

*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा