You are currently viewing 9 ते 17 सप्टेंबर कालावधीत ‘संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची’ उपक्रमाचे आयोजन

9 ते 17 सप्टेंबर कालावधीत ‘संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची’ उपक्रमाचे आयोजन

मालवण:

 

कोळंब गावातील उमेद महिला बचतगटांच्या महिलांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या गावातील महिला बचतगटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि मार्केटमध्ये त्यांनी बनविलेल्या पदार्थांना एक स्थान मिळवून देण्याच्या यामागील उद्देश आहे. यासाठी कोळंब ग्रामपंचायत आणि समर्थ हाॅल या व्यवस्थापनाही त्यांना साथ देणार आहे. महिला बचतगटातील महिलांनी बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडून त्यांना आर्थिक फायदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभिनय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी “संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची” हि टॅग लाईन घेण्यात आलेली आहे. या टॅग लाईनखाली महिला बचतगटांना एकत्रित करण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे.

उमेद, ग्रामपंचायत कोळंब व समर्थ हाॅल कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थीसाठी लागणारे सर्व वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात `संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची’ हा मालवण तालुका मर्यादित उपक्रम 9 ते 17 सप्टेंबर या कालावधीत समर्थ हाॅल कोळंब मालवण याठिकाणी आयोजित केले आहे. महिला समुहांनी तयार केलेल्या अनेक उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे तसेच त्यांना विक्रीचा अनुभव येण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील माहिला समुहांनी तयार केलेल्या अनेक वस्तु एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.

*गणपती आगमन ते विसर्जन सगळ्या वस्तू*
कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात घराघरात साजरा करण्यात येत असतो. या उत्सवात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील अनेक बंद घरेही उघडली जात असतात. मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावात दाखल होत असतात. आता कोकणरेल्वेमुळे अगोदर चार दिवस येणारे चाकरमानी गणेशोत्सवाच्या अगोदर एक दिवस दाखल होतात. यामुळे त्यांनी गणपती या उत्सवासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि इतरही सर्व गोष्टी उपलब्ध करण्यासाठी शहरात धाव घ्यावी लागत आहेत. याच गोष्टीकडे लक्ष ठेवून उमेद या महीला बचत गटाच्या प्रतिनिधीनी चाकरमान्याची होणारी धावपळ थांबवून त्यांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक उत्सवासाठी साहित्य मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात तालुक्यातील मोठय़ा संख्येनेमहिला बचतगट सहभागी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमासाठी ज्या महिला समुहांना आपल्या उत्पादनासाठी स्टाॅल मांडायचे असतील त्यांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कोळंब सरपंच सिया धुरी (7506453362), दिपलक्ष्मी मेथर (9404170505) दर्शना चव्हाण (9405909567) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा