भारतीय जनता युवा मोर्चा कणकवली तालुका शहर मंडल, फोंडा शहर अध्यक्षपदी साहिल सुदन बांदिवडेकर यांची निवड…

भारतीय जनता युवा मोर्चा कणकवली तालुका शहर मंडल, फोंडा शहर अध्यक्षपदी साहिल सुदन बांदिवडेकर यांची निवड…

कणकवली

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कणकवली तालुका शहर मंडल मधील फोंडा शहर अध्यक्षपदी साहिल सुदन बांदिवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे शहर मंडल चे तालुकाध्यक्ष राजन चिके, प्रकाश पारकर, संदीप मेस्त्री, मनोज रावराणे आणि युवा मोर्चा कणकवली शहर मंडलचे तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साहिल बांदिवडेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नितीन पाडावे, पप्पू पुजारे, सर्वेश दळवी, मिलिंद लाड, नितीन पारकर आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा