मैत्री

मैत्री

मैत्री

मैत्री नको फुलांसारखी,
सतत सुगंध देणारी.
चुकताना मैत्रीही…
ती असावी,
काट्यांसारखी टोचणारी.

मैत्री नको सुर्यासारखी,
सतत तापत राहणारी.
समजून घेताना मैत्रीला,
ती असावी,
चंद्राची शीतल छाया देणारी.

मैत्री नको सावली सारखी,
सतत पाठलाग करणारी.
काळोखातही सोबतीला…
ती असावी,
दिव्या सारखी जळणारी.

मैत्री नको आठवणींसारखी,
गरजेपुरतीच धावणारी,
गरज नसतानाही..
ती असावी,
सदा हृदयात वसणारी.

मैत्री नको पावसासारखी,
सतत कोसळत राहणारी.
सुखदुःखात सुद्धा..
ती असावी,
अश्रूंसारखी समान साथ देणारी.

(दीपी)🖋️
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा