सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील विविध १७ संवर्गातील एकूण 334पदांसाठी जाहिरात निघाली असून यामध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक विस्तार अधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे. हे फॉर्म भरण्यासाठी ५ ऑगस्ट २०२३ पासून २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही परीक्षा IBPS या संस्थे मार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार्या नोकर भरती मध्ये पर जिल्ह्यातील तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात निवडले जातात. सिंधुदुर्गातील स्थानिक मात्र या नोकर भरती पासून वंचित राहतात. या नोकर भरती मध्ये सिंधुदुर्गातील तरुण तरूणींचे प्रमाण वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय कॉँग्रेस च्या रोजगार स्वयंरोजगार विभागा मार्फत विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे देखील रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा अध्यक्ष गुलजार काझी यांनी सांगितले.
लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हेल्प लाइन सुरू करणार असल्याचेही गुलजार काझी यांनी सांगितले आहे. या हेल्प लाइन च्या मदतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची जसे की UPSC, MPSC इत्यादि परीक्षेची तयारी करणे सोपे जाणार आहे.
चालू असलेल्या जिल्हा परिषद पद भरती संदर्भात काही अडचणी आल्यास ९१७२६४७५२२ या क्रमांकावर विद्यार्थ्यानी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.