आज पासून नांदगाव येथे पूर्ववत थांबा.
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.
कणकवली
कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद केलेला तुतारी एक्सप्रेसचा थांबा आज पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे तसेच आमदार नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ दखल घेत आजपासून या तुतारी एक्सप्रेसला नांदगाव येथे थांबा मिळालेला आहे त्या तुतारी एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यासाठी बहुसंख्य भाजपा व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रवासी वर्ग उपस्थितीत स्वागत करण्यात आले यावेळी चार दिवसांपूर्वीच याबाबत केंद्रीय मंत्री नारायणराव राणे तसेच आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधले होते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ याची दखल घेत 24 तासात हा थांबा पूर्वरत केला आहे. त्यामुळे सर्व प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले असून नारायणराव राणे तसेच आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
यावेळी भाजप कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे,माजी सभापती मनोज रावराणे, त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगावचे सर्व पदाधिकारी, चालक, मालक, संतोष रावराणे,अजय रावराणे,प्रविन पन्हाळकर,मनाली गुरव,भाई मोरजकर,अनुजा रावराणे,सुनील लाड,छोटू पारकर,अमृत चौगुले, रविंद्र सावंत,दोमोदर नारकर,बाबू घाडी अशोक बोभाटे, सुनील रावराणे, अलंकार रावराणे, महेंद्र रावराणे, प्रदिप रावराणे, सचिन राणे,प्रविन सावंत, स्नेहलता नेगवे, कल्पना सावंत, रमेश तेली, अर्चना किल्ले, अनिता पवार, प्रियांका साळसकर, संदिप गुरव दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.