कणकवली :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या वतीने कणकवली पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळीकर यांच्या उपस्थितीत हे रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रदेश उपाध्यक सौ. प्रज्ञा ढवण, जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, माजी सभापती प्रकाश सांवत,भाजपा शहाराध्या अण्णा कोदे, भाजपा सोशल मिडीया जिल्हा आध्यक्ष समीर प्रभुगावकर, कलमठ सरंपच संदीप मेस्त्री उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, सावडाव उपसरपंच दत्ता काटे,संदीप सावंत, सुभाष मालंडकर लक्ष्मण घाडीगावकर आनंद घाडीगावकर, उमेश घाडीगावकर भाजपा युवा मोर्चाचे गणेश तळगावकर, आयनल माजी सरपंच संतोष वायंगणकर ,स्वरुप कोरेगांवकर उपस्थीत होते.