You are currently viewing जागतिक कीर्तीचे कवींचे कॅलेंडर चे प्रकाशन युवा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते प्रकाशन

जागतिक कीर्तीचे कवींचे कॅलेंडर चे प्रकाशन युवा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते प्रकाशन

*जागतिक कीर्तीचे कवींचे कॅलेंडर चे प्रकाशन युवा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते प्रकाशन-*

पुणे

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय ,भोसरी ,पुणे वतीने दरवर्षी भारतातील अभिनव असे”कवींचे कॅलेंडर “प्रकाशित करण्यात येते. या कॅलेंडरमध्ये कवी कवयित्री व अनेक साहित्यिक तसेच मान्यवर यांचे वाढदिवस व संस्थेच्या वर्षभराच्या उपक्रमांची नोंद सुद्धा या कॅलेंडरमध्ये करण्यात येते. वर्षभर हे कॅलेंडर सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय इ. सर्व ठिकाणी लावण्यात येते. या कवींच्या कॅलेंडरमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी कवयित्रींच्या कवितांचा समावेश सुद्धा यामध्ये केला जातो. या यामध्ये ६० सुंदर अशा प्रकारच्या काव्यरचनाचा समावेश आहे. जणू काय हा वाचकांना काव्यसंग्रह भेट हा मिळत असतो. अनेक मान्यवरांनी या कवींच्या कॅलेंडरचं कौतुक केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्थेच्या शाखा असल्यामुळे शाखांमधून सुद्धा याचे प्रकाशन होऊन संपूर्ण महाराष्ट्रात याचे वितरण सुद्धा केले जाते. प्रत्येक वेळी दर्जेदार अशा प्रकारचं प्रकाशनाचं मूल्य या कॅलेंडरच्या माध्यमातून जपलं जात आहे. या कॅलेंडरची अनेक रसिक वाट बघत असतात.

नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष युवा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते ‘कवींचे कॅलेंडर२०२५’चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप म्हणाले की,”अशा प्रकारच्या कवींचे कॅलेंडरची अभिनव कल्पना संस्थेने राबवली .त्यांचे कौतुक करत आहे. दर्जेदार अशा प्रकारचं मोठ्या स्वरूपात असणार हे कॅलेंडर आहे. आकर्षक रंगसंगती मध्ये छपाई केलेले कॅलेंडर पाहून मला आनंद झाला आहे. माय मराठीची सेवा संस्था अत्यंत उत्तम प्रकारे करत आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची खरच गरज आहे. अभिजात दर्जा वाढवण्यासाठी संस्था गेली पंचवीस वर्ष काव्य क्षेत्रामध्ये काम करत आहे.याचा मला अभिमान आहे. पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानी मध्ये हा सोहळा संपन्न होतोय. याचे सुद्धा समाधान होत आहे. भविष्यातील अनेक उपक्रमांना माझ्याकडून पूर्णपणे सहकार्य राहील.” अशा प्रकारची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी नक्षत्रांचा देणं काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे समाधान ही व्यक्त केले.

या कॅलेंडरची संकल्पना सुप्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांना सुद्धा खूप आवडल्याचं त्यांनी सांगितले आहे. तसेच वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व लेखक दत्तात्रय गायकवाड, निवेदक श्रीकांत चौगुले, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत सोनवणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कवी यशवंत घोडे, कवयित्री दिव्या भोसले, कवी संतोष दळवी, प्रा. सुरेखा कटारिया, चित्रकार सुहास जगताप, मुख्याध्यापक वसंत मोरे, कवी दिलीप विधाटे, डॉ .बी. व्ही. राऊत, महादेव वाळुंजकर,भोसरी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ .हेमलता चंद्रशेखर ,इ. अनेक मान्यवरांनी या कॅलेंडर विषयीच्या भावना व्यक्त करून या कार्याचे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा