You are currently viewing मालवाहक वाहनाच्या चोरीचा पर्दाफाश….

मालवाहक वाहनाच्या चोरीचा पर्दाफाश….

सिंधुदुर्गनगरी

झाराप येथील गंगाराम रेडकर यांच्या मालकीची बोलेरी पिकअप वाहन क्र. एमएच 07 – पी – 2611 हे बालाजी मार्बल, कुडाळ येथून अज्ञात चोरट्याने चोरली होती. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

            सदर गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या पथकाने सखोल चौकशीकरून एका संशयिताकडे चोरीचे वाहन असल्याची माहिती मिळवली. त्यानुसात तपास पथकाने कोल्हापूर व परिसरात चोरीची बोलेरो पिकअप व चोरट्याचा शोध सुरू केला. तसेच मिळालेल्या माहितीवरून सदर संशयितावर यापुर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर आरोपीने वाहनासह पळ काढला व वाहन रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या गावी बेवासर सोडून तेथून पलायन केले. ही बाब तपास पथकास कळताच पथकाने पाली, जि. रत्नगिरी येथून चोरीस गेलेले वाहन हस्तगत केले.

            पोलिसाने केलेल्या तपासाबाबत फिर्यादी श्री. रेडकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यात सहभागी आरोपींविरुद्ध बाहेरील जिल्ह्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून हे सराईत चोरटे आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील यापूर्वी चोरीस गेलेल्या वाहनांचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 9 =