कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये केला प्रवेश
कुडाळ
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ते स्वगृही परतले आहेत यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर हे आमच्या राणे कुटुंबीयांचा एक भाग होते काही काळ ते आमच्यापासून विभक्त झाले होते पण ते आमचे आहेत आमचे राहणार आहेत त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात केला जाईल असे सांगितले तसेच यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे पिंगुळी सहपंचक्रोशीतील गावांमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला भगदाड पडले आहे.
भाजप पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने विकास कुडाळकरसह माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष विष्णू धुरी व कार्यकर्ते यांचा प्रवेश कार्यक्रम पक्षाचे नेते दत्ता सामंत, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने यांच्या माध्यमातून माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंगुळी येथील भवानी मंगल येथे झाला यावेळी भाजप नेते दत्ता सामंत, तालुका अध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, बंड्या सावंत, आनंद शिरवलकर, अँड बंड्या मांडकुलकर, मोहन सावंत, विनायक राणे, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने, मोहन रणसिंग, सागर रणसिंग, मंगेश मसके, शशांक पिंगुळकर, विजय कांबळी, रुपेश कानडे, पप्या तवटे, विजय दळवी, ममता राऊळ, साधना माड्ये, अश्विनी कांबळी, सोनाक्षी गावडे, राजवीर पाटील भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना माजी खासदार नीलेश राणे म्हणाले विकास कुडाळकर तुम्ही परत आमच्या कुटुंबात आलात तुमचे स्वागत आहे गेल्या अडीच वर्षात तुम्ही तिकडे कोरोना कालावधित गेलात आमच्या कुटुंबातील घटक गेल्याने त्यावेळी आम्हाला धक्का बसला. मात्र आता आलात पुन्हा तिकडे जाऊ नका कोरोना लावून घेऊ नका असे सूचित करून तुम्हाला अभिप्रेत असणारा पिंगुळी गावाचा सर्वागीण विकास आम्ही करणार आहोत. तुम्ही केलेल्या प्रवेशाबाबत तुमचा पक्षात मान सन्मान निश्चितच होणार आहे. माझी व येथील स्थानिक आमदार वैभव नाईक आमच्यात दुष्मनी अजिबात नाही. आमचा लढा आहे तो केवळ गेले नऊ वर्षात या आमदारांने लक्षवेधी काम केले नाही सत्ता असताना एकही प्रकल्प आणला नाही आता सत्ता नसताना काय विकासगंगा आणणार? खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वागीण विकास हा आमचे नेते नारायण राणे यांच्या माध्ममातून झाला आहे आणि आजही होत आहे या आमदारांने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाला दहा वर्षे मागे नेले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही राणेंच्या कारकिर्दीतील टाळंबा प्रकल्प, सी वर्ल्ड, अशा प्रकल्पना पुढे दिशा मिळाली नाही एमआयडीसी ओसाड झाली आहे एकूणच या मतदासंघाच्या सर्वागीण विकासासाठी व रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक महत्वाची आहे त्याअगोदर होणाऱ्या जिल्हा परिषदेवर गेली २५ वर्षे आमचे नेते नारायण राणेंच्या विचारांचा असणारा झेंडा सुध्दा यावेळी फडकावयाचा आहे.
पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तीचे सावट असताना येथील आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसात मश्गूल होते अशा निष्क्रीय आमदाराला आता मतदारच २०२४ ला कायमची जागा दाखविणार आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांचे आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी गाजलेले एकतरी भाषण दाखवा विधानसभेत तीस सेकंदापेक्षा जास्त न बोलणारा आमदार विकास काय करणार? असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी आज पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्यात करत ज्यांनी नारायण राणेंचा पराभव केला त्याचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारासुद्धा त्यांनी दिला.
माझी दिशा चुकली होती
प्रवेशकर्ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर म्हणाले मी कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मला बरीच पदे दिली त्यांच्यामुळे मी मोठा झालो माझ्याकडुन दिशा चुकली ती सुधारण्याची संधी मला पुन्हा कुटुंबात घेऊन दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे यापुढे आपल्याला अभिप्रेत असणारे काम करेन
२०२४ चा आमदार निलेश राणेच:- दत्ता सामंत
या मतदासंघाच्या विकासासाठी निलेश राणे यांना आमदार करणे हे आपले सर्वाचे काम आहे राज्यात सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागूया या मतदासंघात भाजप पक्षाचे उमेदवार हे निलेश राणेच असणार आहेत माझ्यासह रणजित देसाई अन्य कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे दत्ता सामंत यांनी सांगून अनेक जुने कार्यकर्ते जे आमच्यापासून लांब गेले आहेत त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांचे प्रवेश भाजपमध्ये करून घेणार असेही त्यांनी सांगितले. सरपंच अजय आकेरकर, संजय वेंगुर्लेकर यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन मंगेश मस्के यांनी केले प्रास्तविक दत्ता पाटील यांनी केले.
फोटो:- माजी खासदार निलेश राणे यांनी प्रवेश करते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर व विष्णू धुरी यांचे भाजप पक्षात स्वागत केले.