You are currently viewing पर्यावरणाच्या जागरासाठी अजय वाघ यांचा पुढाकार

पर्यावरणाच्या जागरासाठी अजय वाघ यांचा पुढाकार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व जाणून संत तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर असा अभंग रचला आहे. मानवी जीवनामध्ये आणि पर्यावरणामध्ये झाडांना खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळेच जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षक सेना उत्तर विभाग मुंबईचे सचिव अजय वाघ यांनी वृक्षारोपण कार्यक्रम माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी आयोजित केला.

घाटकोपर पश्चिम येथील डोंगरभाग येथे महाराष्ट्र शिक्षक सेना प्रांताध्यक्ष जं. मो अभ्यंकर, स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे, शाखाप्रमुख संजय कदम, महाराष्ट्र नेचर पार्कचे अविनाश कुबल, शिक्षक सेना अध्यक्ष अजित चव्हाण, तसेच डोंगर भागातील सर्व कार्यकर्ते यांवेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा