*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम लेख*
*सुरेश भट*
*एक मनस्वी कवी*
*आपल्या स्वतःच्या आयुष्यातील आणि आजूबाजूच्या दुर्बलांची दुःख, वेदना, पिळवणूक आणि छळवणूक अतिशय अचूक, जहालं शब्दात कवितेतून जगापुढे मांडणारे कवी म्हणजे सुरेश भट*.
उर्दू गजलं मराठी भाषेत रुळवण्याचं त्यांचं कार्य सर्वमान्य, असामान्य आहे.
म्हणून ते गजलं सम्राट म्हणूनच ओळखले जातात.
अमरावती येथे एका ब्राह्मण कुटुंबात सुरेश भट यांचा जन्म झाला.त्यांचे वडील डॉक्टर होते. पण
दुर्दैवाने केवळ सुरेश अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलीओची बाधा झाली आणि ते कायमचे अपंग झाले.
जन्माने जरी ते ब्राम्हण कुटुंबात जन्मले तरी एकूणच भारतीय समाजात दलित, दिन, दरिद्री,दुबळे आणि अस्पृश्य लोकांवर होत असलेला अमानुष अन्याय,समाजातील विषमता त्यांना बेचैन करत असे. त्यांचे क्षुब्ध मन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानव मुक्तीच्या परखड विचाराकडे ओढ घेत असे. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने ते फार प्रभावीत झाले आणि परीणामस्वरून भट यांनी बौद्ध धर्माचा शेवटी स्वीकार केला.
समाजातील विषमता असह्य होऊन त्यांची लेखणी बंडाकडे वळली.
एल्गार या त्यांच्या काव्य संग्रहात त्याच्या एकेक रचनेची ताकद कळून येते
देशाला स्वतंत्र्य मिळालं पण समानता आली नाही. स्वतंत्रतेच्या दीर्घ लढ्यात दिन, दलित, खेडुत, आदिवासी हे देखील देखील तितक्याच ताकदीने उतरले होते. पण त्याच्या झोळीत आले केवळ दैन्य आणि वंचना.! म्हणुनच सुरेश भट लिहितात,
उष:काल होता होता काळ रात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
ही त्यांची सपूर्ण कविता काळपटावर विलक्षण काव्य प्रतिभेचा ठळक ठसा तर उमटवून गेली आहेच. पण कित्येक अन्यायग्रस्त मनात एल्गार चेतवत राहते अजूनही.
अन्याय, खेद, विषमता, ढोंगीपणा यावर शब्दांचे आसूड ते ज्या ताकदीने ओढतात तितकेच त्याचे मन प्रेमभावना, शृंगार, निसर्गसौंदर्य याबाबतीत हळुवार होत असे.
स्त्री मनातील प्रीत,ओढ आणि शृंगार भावना ते अतिशय कोमल शब्दात व्यक्त करतात.
‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली….’ ही त्याची रचना नर्म तरीही धीट,उत्कट शृंगारच तरल चित्र रेखाटते.
सुरेश भट यांची गजल क्लिष्ट आणि साचेबद्ध वाटतं नाही. ज्याला गजलेतल शास्त्र कळतं नाही आशा वाचकाला देखील ती तिच्यात गुंगवून टाकते. वाचताना वाटतं, ‘ अरे हे तर माझ्याच मनातील भाव!’
आयुष्यातील स्वतःची आणि दुर्बलांची दुःख, वेदना, पिळवणूक आणि छळवणूक,अतिशय अचूक, जहालं शब्दात कवितेतून जगापुढे मांडणारे कवी म्हणजे सुरेश भट .उर्दू गजलं मराठी भाषेत रुळवण्याचं त्यांचं कार्य सर्व मान्य आहे.
ते गजलं सम्राट म्हणून ओळखले जातात.
समाजातील विषमता असह्य होऊन त्याची लेखणी बंडाकडे वळली.
एल्गार या त्यांच्या काव्य संग्रहात त्याच्या एकेक रचनेची ताकद कळून येते
ते लिहितात,
‘ इतकेच मला जाताना
सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते!
खरच! आजही गरीब शेतकरी, भूमिहीन मजूर, दलित दरिद्री स्त्री,अनाथ मुलं याची अवस्था अशीच आहे. जगण्यापेक्षा मरण बरं असंच वाटत असणारं त्यांना.
माणस इतकी कशी मुर्दाड बनलीयत! सोबतच्या माणसाचं दुःख हल्ली त्याना जराही बेचैन करत नाही हे सत्य आपण रोज वृत्तपत्रात येणाऱ्या
भीषण बातम्या वाचून जाणतोच .याचं अर्थाचा त्यांचा हा शेर किती बोलका आहे पहा.
‘मी रंग पहिला
मुर्दाड मैफालीचा’
‘कुठल्याच काळजाचा ठोका जीवंत नाही’
गांजलेला माणूस उध्वस्त मनस्थितीत कोणाचा आधार, आसरा शोधायला जातो. पण ज्याचा आसरा घ्यावा त्याच्या मनाचं दारच मोडलेलं असतं
पहा त्यांचा हा शेर
‘घर माझे शोधाया
मी वाऱ्यावर वणवण केली’
‘जे दार खुले दिसलें
ते आधीच निखळले होते’…
या जगण्यातील भीषणता,माणसानी आणि दैवानी केलेली फसवणूक अनुभवून ते लिहितात,
जगत मी आलो असा की,
मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की
मग पुन्हा जुळलोच नाही!
असं झालं की जीवनाचा उबग येणं स्वभाविक आहे. ज्याच्यावर विश्वासावं अशी कितीशी माणसं भोवती असतात आपल्या!वेळ आली की माणसाचे खरे रंग कळतात.
‘रंग माझा वेगळा’ या संग्राहात ते जगाचं खरं रूपं उघडं करतात.
जीवनाचा उबग येऊन लिहून जातात…
आता असे जगायचे
माझे किती क्षण राहिले
माझ्या धुळीचे शेवटी
किती कण राहिले…
सुरेश भट याची कविता म्हणजे गुंता गुंतीच्या मानवी भावभावनाचं जाळीदार वस्त्र. त्यातून पलीकडे पाहिलं की दुनियेतील सुख दुःख आशा निराशा, सोबत आणि ऐकलेपण, ढोंग आणि निर्मळता, सौंदर्य आणि कुरूपता, क्रूरता आणि ममता या भावना एकत्र नांदतांना आपल्याला दिसतात आणि त्याचं शब्दसामर्थ्य पाहून विस्मय चकीत होतो आपण
@अंजना कर्णिक, मुंबई
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————