You are currently viewing ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विठ्ठल काटे यांची बिनविरोध निवड तर ॲड विक्रमसिंह काळे यांच्या सहित 14 जणांची सदस्य पदी निवड

ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विठ्ठल काटे यांची बिनविरोध निवड तर ॲड विक्रमसिंह काळे यांच्या सहित 14 जणांची सदस्य पदी निवड

वैभववाडी

सडूरे शिराळे ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती 26 जुलै 2023 च्या ग्रामसभेमध्ये स्थापन करण्यात आली यामध्ये अध्यक्ष सहित सर्व सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. तत्कालीन अध्यक्ष दीपक चव्हाण यांची ऑगस्ट 2022 च्या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाली होती परंतु डिसेंबर मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत दीपक चव्हाण हे सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते त्या पार्श्वभूमी वरती त्यांनी आपल्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते पण रिक्त झाले होते म्हणून जानेवारी 2023 च्या ग्रामसभेत रिक्त पद भरण्यात आले त्यावेळी सौ हेमा सावंत यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती. एक वर्षानंतर ही समिती पुनर्गठीत करण्याकरिता जुलै 2023 च्या ग्रामसभा अजिंठ्यावरील विषयानुसार तंटामुक्ती समिती अध्यक्षपदा सहित सर्व समिती पुनर्गठीत करण्यात आली.या सभेत अध्यक्षपदासहित सदस्य पदांची ही निवड जाहीर करण्यात आली. या सभेत श्री विठ्ठल महादेव काटे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड तर सचिव पदी प्रभारी पोलीस पाटील संदीप मोतीराम पाटील यांची निवड करण्यात आली. समितीच्या सदस्य पदी ॲड.विक्रमसिंह काळे (वकील प्रतिनिधी), दीपक चव्हाण (सरपंच), आनंद विठ्ठल जंगम (अनुसूचित जाती), रुक्मिणी विठ्ठल शेळके (भटके विमुक्त जाती व जमाती), सागर सत्यवान मेजारी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), श्री नवलराज विजयसिंह काळे (ग्रामपंचायत सदस्य), दीक्षा दत्ताराम रावराणे (ग्रामपंचायत सदस्या), चेअरमन संतोष विष्णू भोसले (सहकार संस्था प्रतिनिधी),विनोद गोपाळ करपे (प्राथमिक शाळा प्रतिनिधी), श्री नितीन सदाशिव खाडे (पोलीस प्रतिनिधी बिट अमलदार),प्रशांत चंद्रकांत जाधव (ग्रामसेवक), अक्षय अरविंद लोणकर (तलाठी),अंकिता उमेश डेळेकर (सर्वसाधारण) अशी एकूण 15 जणांची निवड या समितीत जाहीर करण्यात आली. उपस्थित सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने सरपंच दीपक चव्हाण यांनी अध्यक्ष व सर्व समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी. सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच आनंद जंगम, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, दीक्षा रावराणे रेशमा बाणे ग्रामसेवक प्रशांत जाधव, व इतर शासकीय कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा