You are currently viewing वेंगुर्ले शहरातील तांबळेश्वर भगवती मंदिरात चोरी

वेंगुर्ले शहरातील तांबळेश्वर भगवती मंदिरात चोरी

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यात मंदिरातील फंडपीटी किंवा वस्तू चोरण्याच्या प्रकरणात वाढ होत आहे. गुरुवारी मध्यरात्री शहरातील तांबळेश्वर भगवती मंदिरात अज्ञातांनी दरवाजा फोडून चोरी केल्याचे उघड झाले आहे.
आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता नितीन कुबल पुजा करण्यास गेलेले असताना त्यांना मंदिराच्या दरवाजा फोडलेल्या स्थितीत आढळला. मंदिरातील काही साहित्य चोरीस गेले आहे.
मठ येथील स्वयंभू मंदिरातील चोरी, सागरेश्वर येथील मंदिरातील चोरी, कॅम्प येथील मारुती मंदिरातील चोरी ही महिन्याभरातील प्रकरणे झाली असतानाच आज नव्याने भगवती मंदिरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. तरी वेंगुर्ले पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा