You are currently viewing पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा..

पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पाऊस – शेती – पीक वाह.. वा.. वाह.. वा..*

एक दिवस माझ्याही
सुपीक डोक्याच्या शेतीत
विचारांचा पाऊस पडेल

मग मी करेन पेरणी
शब्दाशब्दांची
अक्षरे जुळवून
ज्ञानार्जनाने मिळवलेल्या
खत पाण्याने मशागत करून
उगवेल अंकुर साहित्याचा
डोक्याचा वाफा झाल्यावर

त्यावर विवेक बुद्धीच्या
सुवर्ण किरणांची ऊब देऊन
सुंदर, स्वच्छ, सुवासिक
निर्मळ, ताजे,रसदार हरित
साहित्याचे पीक घेईन

घेतील सारे त्याचा स्वाद
आवडीने करतील प्रशंसा
मिळेल प्रसिद्धी
माझ्या सुपीक डोक्याच्या
शेतीतील पिकाला
म्हणतील सारे
वाह… वा… वाह… वा…

कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा