You are currently viewing फोंडयाच्या पारावरच्या विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या जुगाऱ्यांची बैठक सुरूच…

फोंडयाच्या पारावरच्या विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या जुगाऱ्यांची बैठक सुरूच…

पालकमंत्र्यांच्या नावाचा केला गैरवापर

 

राजापूर :

फोंडयाच्या पारावरचा विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या जुगाऱ्याने आपल्या साथीदारांसह आपले बस्तान मांडले आहे खारेपाटण-राजापूर रस्त्यावरील राजापूर पासून पाच मिनिटांच्या अंतरावरील उजव्या बाजूच्या बंद असलेल्या हॉटेलमध्ये. सिंधुदुर्गातील सर्व सुरक्षित जागांवर बस्तान बसविणे अवघड झाल्याने त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा रस्ता धरला आहे. परंतु *’रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांकडून त्रास होऊ नये याची खबरदारी घेताना त्यांनी  पालकमंत्र्यांच्या दुरान्वये संबंध नसताना आपला जुगार अड्डा सुरक्षित चालावा म्हणून  पालकमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याची राळ उठवून दिली होती.’* परंतु मीडियाने याबाबत चौकशी केली असता विठ्ठल जप करणाऱ्यांच्या जुगाराच्या अड्डयांशी त्यांचा काहीही संबंध येत नसल्याचे समोर येत आहे.

राजकीय वरदहस्त लाभलेल्या सिंधुदुर्गातील या जुगाऱ्यांनी आता सुरक्षा मजबूत रहावी म्हणून जुगार अड्ड्याच्या बाहेर रखवालदारीसाठी दोघांची नेमणूक केली असून, बाहेर कोणतीही गडबड झाल्यास हे दोघेजण त्याची खबर जुगार अड्ड्यावर पोचविण्याचे काम करतात. त्यामुळे धाड पडण्या आधीच पळण्याचे सुद्धा व्यवस्थित प्लॅनिंग केलेले आहे.

उद्यापासून याच ठिकाणी पत्त्यांचा क्लब सुरू करून कायदेशीर रमी क्लब च्या नावावर राजरोसपणे जुगार सुरू करण्याचे या पारावरच्या विठ्ठल जप करणाऱ्या जुगाऱ्याने आणि त्याच्या टीमने ठरविले आहे. २२ जणांची तकशीम असलेला हा मोठा जुगार अड्डा रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असून तो कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे याची मात्र उलटसुलट चर्चा केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =