You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

भाजप महिला मोर्चातर्फे उपक्रम : वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

सावंतवाडी

भाजपचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सावंतवाडी महिला मोर्चाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला. सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील प्रशालेत हा उपक्रम राबविला. मूलांना यावेळी खाऊ वाटपही करण्यात आले.
आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवित त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मोहीनी मडगांवकर यांच्यासह माजी नगरसेविका दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, अस्मिता भराडी, साक्षी गवस आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा