You are currently viewing ….तर कंगनाला त्वरीत अटक होऊ शकते,

….तर कंगनाला त्वरीत अटक होऊ शकते,

…तर पोलीस कोर्टात जाऊन कंगनाविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे महत्त्वाचे निरीक्षण

जळगाव

अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध दाखल असलेल्या खासगी फौजदारी खटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या पोलिस तपासात कंगना रनौतने सहकार्य न केल्यास तीच्या कायदेशीर कारवाईला शक्य असल्याचे असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले.

आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला दोन वेळा समन्स बजावले. तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कंगनाने या समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते. अर्थात पोलीस याकरता तिला त्वरित अटक देखील करू शकतात. मुंबई पोलीस ऍक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात, असे मतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौत-चंदेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त ट्वीट करताना हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि रंगोलीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 11 =