You are currently viewing मनाला चटका लावणारी इर्शाळवाडी येथील दुर्घटना

मनाला चटका लावणारी इर्शाळवाडी येथील दुर्घटना

*मनाला चटका लावणारी इर्शाळवाडी येथील दुर्घटना*

*रुपेश पवार*

मुसळधार पाऊस, गार वारा, वाहणारे झरे, धबधबे, हिरवागार डोंगर अशा बऱ्याच गोष्टींचे वर्णन आपण नेहमी करत असतो. पावसाचा आनंद उत्सव साजरा करत असतो पण हा पाऊस बऱ्याचदा प्रलयाला घेऊन येतो. अशीच एक दुर्घटना बुधवारी एकोणीस जुलैला, रात्री साडेदहा वाजता रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडली. त्या वाडीत ४९ कुटुंबांचा निवास होता. त्यातील काही घरांवर डोंगरावरचा एक कडा कोसळला. पावसामध्ये डोंगराळ भागात काही ठिकाणी वाहत्या पाण्यामुळे दगड, माती खिळखिळी व भुसभुशीत होते आणि ते सर्व जोराने खाली सरकू लागते. पाण्याच्या प्रचंड लोटा बरोबर ती दगड माती अतिजोराने वाहून रस्त्यावर, वस्तीवर, वाडीवर अथवा गावावर कोसळते. मग तिथली घर जमीनदोस्त होतात, त्या ढिगाऱ्याखाली दबतात. अशा प्रकारच्या दुर्घटना भारताच्या उत्तरांचल, हिमाचल भागात दरवर्षी घडतात.

इर्शाळवाडीतली ही दुर्घटना अशाच प्रकारची होती. महाराष्ट्रातील हे सर्वात रेस्क्यू ऑपरेशन होते. सर्व यंत्रणा या गडाखाली पोहोचल्या होत्या परंतु डोंगर चढाई, वेड्या वाकड्या वाटा, निसरडा रस्ता. या सर्वातून वाट काढत जाणे अवघड होते. स्वयंसेवक, सरकारी कर्मचारी, अधिकारी, राजकीय नेते. अशा सर्वांना मोठी पायपीट करावी लागली. जखमी, गायबंदी लोकांना गडाखाली नेने अवघड झाले होते, तरीही प्रयत्नांची शिकस्त करत या सर्व मानव सेवकांनी त्या लोकांना गडाखाली आणले. प्रचंड ढिगारा, चिखल, ‘हजार हातांनी उपसत माणसं माणसांना शोधत होती, बाहेर काढत होती’. सरकारी आकड्यानुसार आतापर्यंत २७ लोक या प्रलयात दगावलेले आहेत. ५७ पैक्षा जास्त लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्याचप्रमाणे काही लोक कामानिमित्ताने गावाबाहेर गेले होते. अशा लोकांचा शोध लागेल. घराबाहेरील लोक जास्त संख्येने असावेत, असेही सरकारला वाटत होते. त्यामुळे जीवित हानी कमी होईल हा सरकारचा कयास अजूनही खरा ठरावा. असे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेचे शोध कार्य आता थांबले आहे. गेले तीन-चार दिवस ही शोध मोहीम सुरु होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी आपले सर्व दौरे, कामे बाजूला सारून, अतिशय वेगाने हालचाल करत, इर्शाळवाडी गाठली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे ते गडावर चढून गेले. अशा दुर्घटनेच्या वेळी जबाबदार माणसाने जवळ असणे गरजेचे असते. ती गरज मुख्यमंत्री शिंदे यांनी ओळखली. म्हणून हे रेस्क्यू ऑपरेशन जलद गतीने पुढे सरकले. त्यानंतर ही शोध मोहीम अहोरात्र सुरू होती. या दुर्घटनेत वाचलेल्या लोकांचे निवासी पुनर्वसन करायचे. त्यांना मानसिक, सामाजिक दिलाचा देऊन सर्वसामान्य प्रवाहात आणायचे. हे काम आव्हानात्मक आहे. मुख्यमंत्र्यांनी हे कार्य कर्णधाराप्रमाणे केले. या लोकांना तात्पुरत्या निवासाची चांगली सोय करून दिली. त्यानंतर लगेच ह्या बेघर लोकांना महाराष्ट्र शासनातर्फे योग्य ठिकाणी घरे बांधून देण्याचा निर्णय तात्काळ घेतला. या दुर्घटनेतील माणसांचे अशा प्रकारे निवासी पुनर्वसन सुरू झाले आहे. पण त्यांना आता मानसिक सबळता देणे महत्त्वाचे आहे. नातेवाईकांचे आकाली जाणे, आपल्यात नसणे हे कुठल्याही माणसाला सहन होत नाही. संवेदना त्यांच्याशी जोडलेली असते. या सर्व गोष्टींचा विचारही महाराष्ट्र सरकारला करावा लागेल.

इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेतून इतर गावातील, शहरातील नागरिकांनी, गावकऱ्यांनी लक्षात घ्यावे. आपल्या आजूबाजूला असे डोंगरकडे असतील आणि तिथे मुसळधार पाऊस सातत्याने पडत असेल, तर तिथून आपण सुरक्षित ठिकाणी आले पाहिजे. कारण ‘जान सलामत तो पगडी पचास’ हे आपण सर्वांनी जाणले पाहिजे. पूर्वंपार इतिहासाकडे आपण पाहिले, तर माणूस हा सुरुवातीला भटका होता. नंतर शेतीचा शोध लागल्यावर माणूस वस्ती करू लागला. मग गावं तयार होऊ लागली. ते माणसाचे जीवन आजपर्यंत तसेच सुरू आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक संकटाच्या वेळी, माणसाने पटकन विचार करून गाव सोडावे. माणसाने इथे हे लक्षात ठेवले पाहिजे. गावं आपण पुन्हा निर्माण करू शकतो पण आपल्यातून गेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करू शकत नाही. याचा विचार करून सामान्य माणसाने, सरकारने चालावे. असे या दुर्घटने विषयी म्हणावेसे वाटते. १९९० च्या दशकात लातूर, किल्लारी गावामध्ये सर्वात मोठा भूकंप झाला होता. त्या भूकंपात अनेक माणसे दगावली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुद्धा अशीच धाव घेऊन. त्या गावकऱ्यांना पूर्ण दिलासा दिला होता, पुनर्वसन केले होते. तो प्रसंग आपल्या सर्वांना आठवत असेल. यानंतर २००१ च्या सुमारास भुज मध्ये भूकंप झाला होता तेव्हा तिथल्या सरकारने अशाच प्रकारे मानव सेवा केली होती. तोही प्रसंग येथे आठवतो.

परंतु भू खचने, कडा कोसळणे या घटना कधीही अचानक घडत नाहीत. त्याला पाऊस कारणीभूत असतो. त्यामुळे मुसळधार पाऊस सतत पडत असेल, तर सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी. सरकारी यंत्रणा त्यावेळी जास्त प्रमाणात आपल्याला सहकार्य करेल. त्यामुळे कुणीही पुढील काळात जीवावर उदार होऊ नये. या दुर्घटनेत दगावलेल्या सर्व गावकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या जीवित प्रियजनांना देवाने जगण्याचे सामर्थ्य द्यावे. हीच प्रार्थना.

नसतो आपला

पाऊस हा
होतो कधी वेडापिसा
डोंगरकड्यांना पाडतो हा
दगड मातीत गांवाला
निर्दयी गाढतो हा

माणसाचा निवारा
घर एक असतो सहारा
त्याला सोडण्याचा
नसतो मनाचा इरादा

म्हणून घर छताला
सोडत नाही माणूस हा
स्वर्ग असतो माणसाचा
त्या चार भिंतीचा

नसतो सुमार पावसाला
अंधार असतो अंदाधुंदीचा
मग होतो प्रलय कसा
माणूस मिळतो मातीला

नाद धरू नका कसला
घनघोर पाऊस नसतो आपला
घर गांव होईल पुन्हा
आपला माणूस नाही भेटायचा

पाऊस हा
होतो कधी वेडापिसा

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा