*बांदा येथील वाळके कुटुंबीयांना आर्थिक मदत*
बांदा
*शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी बांदा येथील वाळके कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली.
अतिवृष्टीमुळे बांदा बाजारपेठेत पाणी घुसल्याने वाळके कुटुंबियांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली.आणि वाळके कुटुंबियाना आर्थिक मदत दिली. वाळके कुटुंबीयांनी मदत मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आभार मानले.जिल्हाप्रमुख संजय पडते व समन्वयक बाळा गावडे यांनी बांदा बाजारपेठेतील नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी बांदा शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओमकार नाडकर्णी, राजदीप पावसकर, ज्ञानेश्वर एडवे, ग्रामपंचायत सदस्य देवल एडवे, सदस्या रिया एडवे, राकेश विर्नोडकर,साई करमळकर, नितीन वाळके, राजेश पावसकर, हनुमंत नाटेकर, अशोक परब आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.