You are currently viewing आम. वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट – भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे

आम. वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट – भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे

कणकवली

आमदार वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट आलेले आहेत. श्री संप्रदायाच्या विरोधात गेल्याची फळे आमदार वैभव नाईक यांना भोगावी लागतील.आमदार वैभव नाईक हे “उपजुनी करंट नेने, अद्वैत वाटा” प्रमाणे नको त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत.असा टोला भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी लगावला आहे.
कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री संतोष कानडे बोलत होते. यावेळी भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, संतोष चव्हाण उपस्थित होते.
संत तुकाराम यांच्या जातो न येतीया वाटा..काय निरवतो करंटा.. कैसा जालासे बेशरम… लाज नाही न म्हणे राम यांच्या ओवीचा दाखला देत संतोष कानडे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली. धर्माधिकारी यांच्या श्री संप्रदायाबद्दल वैभव नाईक यांनी काढलेले उदगार चुकीचे आहेत. नानासाहेब धर्माधिकारी आणि श्री सदस्यांबद्दल आमदार नितेश राणे संभ्रमावस्था निर्माण करत असल्याची टीका वैभव नाईक यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
6 महिन्यांमागिल अधिवेशनात काँग्रेस काढलेल्या मुद्दाला तात्काळ वैभव नाईक अथवा उबाठा सेनेच्या आमदारांनी हरकत का घेतली नाही ? त्यांच्या मुद्दयाला खतपाणी घालण्याचे कामच उबाठा सेनेने केले. आणि आता 6 महिन्यांनी मागील मुद्दा उकरून पुन्हा श्री सदस्यांच्या भावना आमदार वैभव नाईक दुखावत आहेत. याची फळे त्यांना भोगावी लागतील अशी टीकाही कानडे यांनी केली. तसेच काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत असणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदार वैभव नाईक यांना त्यावेळी बोलायला तोंड धरले होते का असा सवाल देखील संतोष कानडे यांनी केला.

अवघ्या १० महिन्यांचा आ. नाईक यांचा कालावधी राहिला आहे.या वेळेत त्याची जनतेच्या हिताचे प्रश्न मांडावेत.लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.संप्रदाय बद्दल तुम्ही बदनामी करत असाल तर जशास तसे उत्तर दिला जाईल.मात्र,कुडाळ – मालवण विधानसभेचे पुढील आमदार निलेश राणेंच असणार आहेत.राजकारण आणि अध्यात्म यात फरक आहे,हे वैभव नाईक यांनी लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा