You are currently viewing वेंगुर्लेतील सेंटलुक्स हाॅस्पीटलच्या विहीरीत आढळला युवकाचा मृतदेह…

वेंगुर्लेतील सेंटलुक्स हाॅस्पीटलच्या विहीरीत आढळला युवकाचा मृतदेह…

वेंगुर्ले

शहरातील सेंटलुक्स हॉस्पीटलच्या विहीरीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. साईश सुरेश वेंगुर्लेकर (वय ३१) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा उघड झाला. त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सेंटलुक्स हॉस्पीटल कंम्पाउंडमध्ये साईश याचे घर आहे. घराच्या बाजूला असलेल्या विहिरी मध्ये मध्यरात्री त्याचा मृतदेह दिसून आला. साईश याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. याबाबत कमलाकर आपा वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास तपास पोलिस उपनिरीक्षक तुकाराम जाधव आणि पोलिस हवालदार चव्हाण हे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + five =