You are currently viewing वन वैभव

वन वैभव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”वनसंवर्धन दिनाच्या शुभेच्छा”*      

             *”वन वैभव”*

 

वन राष्ट्र वैभव संपत्ती आहे महान

तुकोबा म्हणती वृक्षवेली सोयरे जाणIIध्रुII

 

किटक पशुपक्षी यांचे करावे संवर्धन

भ्रमर चोखती मध फुलावर बसून

जीवन चक्र चाले परागीभवनानंII1II

 

जाणवे महत्व वृक्षवेलींचे संगतीत

निरपेक्ष अन्न वस्त्र निवारा पुरवीत

हवा शुद्ध होई रक्षिते पर्यावरणII2II

 

वृक्षवेलींची सर्वत्र करावी लागवड

पंचमहाभूते समतोलती वातावरण

वृक्ष वेली सांभाळती जमिनीचा पोतII3II

 

जळाचे बनती मेघ वर्षा करी संतृप्त

एकमेकांना पूरक चक्र निसर्ग दत्त

वाचवावी वृक्षतोड वणवे आगी पासूनII4II

 

वनौषधी माणसाला आहे वरदान

सौष्ठव उत्पन्न मिळे नैसर्गिक पर्यटन

राष्ट्रीय संपत्तीचे करावे रक्षण जतनII5II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा