You are currently viewing जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सात प्रतिनिधींची निवड.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सात प्रतिनिधींची निवड.

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या परिषदेवर ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ संस्थेच्या सात प्रतिनिधींची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून १७ प्रतिनिधींची अशासकीय सदस्य म्हणून निवड जाहीर झाली आहे.
महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांनी नुकत्याच जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तीन वर्षासाठी करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील २८ अशासकीय सदस्य पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. १७ जुलै रोजी के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांनी १७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.यामध्ये अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी- १०, महाविद्यालय प्रतिनिधी- २, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी- २, पेट्रोल विक्रेता प्रतिनिधी- १ व शेतकरी प्रतिनिधी- २ अशा एकूण १७ अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ग्राहक संरक्षण अधिनियम- २०१९ मधील तरतुदीनुसार ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन व संरक्षण करणे यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ संस्थेची जिल्हा आणि तालुका शाखा ग्राहक जागृतीचे कार्य करीत आहेत. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय संस्थांचे १० प्रतिनिधींची निवड झाली आहे. त्यामध्ये अशासकीय संस्थेचे ६ प्रतिनिधी आणि महाविद्यालय प्रतिनिधी प्रवर्गातून १ असे एकुण सात सदस्य हे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे प्रतिनिधी आहेत. त्यामध्ये संस्थेच्या जिल्हा शाखेचे संघटक श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर-कणकवली, जिल्हा सचिव श्री.संदेश तुळसणकर- वैभववाडी, सहसचिव सामिया चौगुले-देवगड, वैभववाडी तालुका अध्यक्ष श्री.तेजस साळुंखे, कुडाळ तालुका अध्यक्ष श्री.आनंद मेस्त्री व सदस्य श्री.विष्णुप्रसाद दळवी यांचा समावेश आहे.
तसेच महाविद्यालय प्रतिनिधी या प्रवर्गातून ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा. श्री.एस.एन.पाटील यांची निवड झाली आहे.
प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून काम केलेले आहे. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ग्राहक चळवळ पोचवून “सजग विद्यार्थी ग्राहक अभियान” संस्था आणि प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवड प्रक्रियेत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ विजय लाड, सचिव श्री.अरुण वाघमारे, संघटक श्री.सर्जेराव जाधव व इतर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या निवडीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा