You are currently viewing केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव…

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव…

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव…

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी…

कणकवली

भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राज्य आणि देशातील अनेक नेते, मंत्री, पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर ओम गणेश निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देत आहेत.

सकाळपासूनच ओम गणेश निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या रांगा शुभेच्छा देण्यासाठी लागलेल्या आहेत. आज संपूर्ण दिवसभर हा कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह पाहावयास मिळत आहे. सायंकाळी ओम गणेश निवासस्थानी विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा