बांदा
बांदा शहरात काल आलेल्या पुरस्थितीत बांदा पोलीस प्रशासनाने स्थानिकांना अलर्ट करण्यासाठी सुयोग्य नियोजन केले. पोलिसांनी रात्रभर पूर्णप्रवण भागात फिरून लोकांना सातत्याने सावध केले. त्यांनी आपत्कालीन परिस्थिती ओळखून केलेल्या आवाहनमुळेच नुकसानीचे सत्र कमी झाले. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे बांदा शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी दिली आहे.
काल सायंकाळी बांदा शहरात तेरेखोल नदीचे पाणी शिरले. आळवाडी तसेच पारिसरात पाणी आल्याने स्थानिकांची तारांबळ उडाली. मात्र पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, तलाठी फिरोज खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी आपले वाहन फिरवून लोकांना ध्वनीक्षेपकाद्वारे अलर्ट केले. त्यामुळे व्यापारी अलर्ट झाल्याने नुकसानी कमी झाली.