You are currently viewing पावसा तू

पावसा तू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पावसा तू*

आमच्या खान्देशात पाऊस म्हणजे अगदीच बेभरवशाचा त्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.
असा हा लहरी पाऊस आला काय अन् गेला काय काही लोकांना त्याचा काहीच फरक पडत नाही.
असाच आमचा कवी मनाचा माणूस कवितेत पावसाला काय म्हणतो या आशयाची ही कविता.

*पावसा तू*

पावसा तू
आला काय अन् गेला काय
आम्हाला फरक पडत नाय
तुझं येणं तुझं जाणं
डोळ्याला आता दिसत नाय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

तुझं बरसणं डोळ्याला दिसणं
ताटाला पुसणं
अस्तित्व तुझं एवढंच हाय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

तुझे येणे मिनिट भराचे
रस्ते ओले औट घटकेचे
डोळ्यातून आसवे गळले नाय
(आला तर आनंदाश्रू नाही आला तर दुःखाश्रू )

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

तू शहाणा आम्ही वेडे
वाट तुझी पाहणे
हा एकच पर्याय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

कुठे पडतो मुसळधार
कुठे येतो महापूर
आमच्या वाट्याला मात्र
दुष्काळाचाच धूर
त्याची आम्हाला आता
सवयच झाली हाय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

तुझा हट्टीपणा
तुझा लहरीपणा
तुझ्या पट्ट्यात
आम्ही येतंच नाय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

कोणी मरो कोणी जगो
तुला ना कोणाचं
सोयर ना सुतक हाय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

धन धान्य राशन पाणी
सारं काही विकत मिळतं
आमच्यापाशी पैसा भरपूर हाय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

खाणं-पिणं उठणं-बसणं
आमचं मजेत चालू हाय
तुझ्या वाचून आमचं
अडतंय काय

आला काय गेला काय
आम्हाला फरक पडत नाय

आमचं बी सरकार
पाठीशी हाय
नुकसान भरपाई
देणार भाय

पावसा तू
आला काय अन् गेला काय
आम्हाला काय बी फरक पडत नाय

कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा