You are currently viewing जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर वैभववाडी तालुक्यातून चौघांची निवड.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर वैभववाडी तालुक्यातून चौघांची निवड.

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातून वैभववाडी तालुक्यातील चौघांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांनी नुकत्याच जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तीन वर्षासाठी करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये महाविद्यालय प्रतिनिधी या प्रवर्गातून प्रा. श्री. एस. एन. पाटील यांची निवड झाली आहे. ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी या प्रवर्गातून ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे सचिव श्री.संदेश तात्या तुळसणकर तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र-वैभववाडी तालुका अध्यक्ष श्री.तेजस प्रकाश साळुंखे यांची निवड झाली आहे. तसेच शेतकरी प्रवर्गातून श्री.महेश रामदास संसारे अशा चौघांची निवड झाली आहे.
प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून काम केलेले आहे. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व संस्थेचे राज्य सदस्य या पदावर कार्यरत आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ग्राहक चळवळ पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील ग्राहकांचे संघटन, प्रबोधन व त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे श्री.संदेश तुळसणकर व श्री.तेजस साळुंखे यांनी सांगितले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे संघटन करुन शेतकरी वर्गाचे प्रबोधन करणार असल्याचे श्री.महेश संसारे यांनी सांगितले. या सर्वांच्या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा