*फक्त ९९ रुपयात होणार तपासणी*
कुडाळ :
मधुमेही आणि अतिरक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी माधवबाग आणि मिरज नॅब आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खास डोळ्यांचे तपासणी शिबिर २५ जुलैला सकाळी ९.३० ते ४.३० या वेळेत कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात १२०० रुपये तपासणी *फक्त ९९ रुपयांमध्ये* उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच डोळ्यांचा प्रेशर तपासणे, डोळ्यांचा मागचा पडदा तपासणी (रेटिना), डोळ्याचा कोरडेपणा तपासणी, चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माधवबाग परिवाराकडून वैद्यकीय सल्ला, रँडम ब्लड शुगर, एस पी ओ २, हार्ट रेट, ब्लड प्रेशर चेकअप आदी सुविधा देण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त रुग्णांनी शिबिरासाठी उपस्थित राहावे आणि इच्छुकांनी आपली नावे खालील नंबर वर नोंदवावी, असे आवाहन माधवबाग परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
संपर्क : कणकवली- ९३७३१८३८८८, कुडाळ- ९०११३२८५८१, सावंतवाडी- ७७७४०२८१८५