You are currently viewing गॕस वितरक व गॕस ग्राहकांची संयुक्त बैठक आयोजित करावी…..

गॕस वितरक व गॕस ग्राहकांची संयुक्त बैठक आयोजित करावी…..

मा.तहसिलदार वैभववाडी यांच्याकडे ग्राहक पंचायतची मागणी

वैभववाडी

वैभववाडी तालुक्याची निर्मिती होऊन ३७ वर्षे आणि वाभवे-वैभववाडी नगर पंचायतची स्थापना होऊन ५ वर्षे झाली. दिड-दोन वर्षापूर्वी वैभववाडीसाठी स्वतंत्र इंण्डेन गॕस एजन्सी सुरु झाली आहे. अजूनही वैभववाडीची वाहतूक व्यवस्था कणकवली एसटी डेपोवर अवलंबून आहे. वैभववाडी येथे अद्यापही काही मूलभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. गॅस ही एक मूलभूत सुविधा आहे. वैभववाडी तालुक्यातील हजारो गॅसधारक हे भारत, एचपी व इंडियन या कंपन्यांचे गॅसग्राहक आहेत. या गॕस वितरकांकडून योग्य सेवा मिळत नाहीत. काही गॅस एजन्सी अर्थात वितरकांकडून ग्राहकांना वेळेत गॕस न देणे, जादा किंमतीने गॅस विकणे, गॕस खरेदीची पावती न देणे, पासबुक न देणे, सब डिलरव्दारे गॕस पुरवठा करणे इत्यादी स्वरुपाच्या तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेकडे आलेल्या आहेत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने मा.तहसीलदार वैभववाडी यांनी वैभववाडी तालुक्यातील गॕस ग्राहकांना गॅस वितरक करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी व तालुक्यातील गॅस ग्राहकांची संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणी मेलव्दारे केली आहे. गॅस वितरकांनी आपल्या ग्राहकांना पुरवायच्या सुविधा तसेच गॅस धारकांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. यासाठी वैभववाडी तालुक्यात गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींच्या प्रतिनिधींची व गावनिहाय गॅस ग्राहक प्रतिनिधी यांची संयुक्त सभा आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करावी. तालुक्यातील गॅसग्राहक आणि वितरक यांच्यातील दरी कमी होऊन वितरक आणि ग्राहक यांचे नाते दृढ होण्यास मदत होईल. आपण लवकरात लवकर या संयुक्त सभेचे आयोजन करावे, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा, वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने करीत आहोत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्यावतीने संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी या भूमिकेतून कार्य करीत आहे. आपल्याकडून योग्य आणि सकारात्मक कार्यवाहीच्या प्रतीक्षेत असल्याची भावना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र- जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील, तालुका संघटक शंकर स्वामी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 5 =