You are currently viewing चार दहशतवाद्यांना कंठस्नान..

चार दहशतवाद्यांना कंठस्नान..

श्रीनगर :

 

जम्मू काश्मीर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांदरम्यान एक मोठी घटना घडल्याचं पाहायला मिळालं. ज्याअंतर्गत सुरक्षा दलासोबतच्या चकमकीमध्ये सदर प्रांतातील नगरोटा विभागात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालं. तर या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टोल प्लाझापाशी गोळीबार झाल्याचं लक्षात येताच जम्मू काश्मीर राष्ट्रीय महारार्गावरी नगरोटा क्षेत्रातील वाहतूक बंद करण्यात आली. जम्मू जिल्हा पोलीस आयुक्त एसएसपी श्रीधर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी येथील सुरक्षा दलांवर बेछूट गोळीबार सुरु केला. बान टोल प्लाझा  येथे ते एका वाहनात लपलेले होते.

 

सदर कारवाईमुळं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तातडीनं थांबवण्यात आली. नगरोटा आणि उधमपूर भागात कोणत्याही वाहनास प्रवेशास बंदी घालण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =