You are currently viewing ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मधे कंटेनमेंट झोन सहित संपूर्ण गावामध्ये सुरु झाली सॅनीटायजर फवारणी ; ग्रा.प. सदस्य नवलराज काळे यांच्या सूचनेची ग्रामपंचायतीने केली अंमलबजावणी

ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मधे कंटेनमेंट झोन सहित संपूर्ण गावामध्ये सुरु झाली सॅनीटायजर फवारणी ; ग्रा.प. सदस्य नवलराज काळे यांच्या सूचनेची ग्रामपंचायतीने केली अंमलबजावणी

वैभववाडी

ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे विद्यमान सदस्य नवलराज काळे यांनी ग्रामपंचायतीला कंटेंटमेंट झोन सहीत संपूर्ण गावामध्ये सॕनीटायजर फवारणी करण्याच्या केल्या होत्या सूचना.या सुचनेची ग्रामसेवक,सरपंच यांनी दखल घेत या‌ सुचनेची अमलबजावनी करण्यात आली. दि.०७ मे २०२१ रोजी सकाळी सॅनीटायझर फवारणी करण्यास सुरवात झाली. सडूरे चव्हाणवाडी पासुन फवारणी करण्यास सुरूवात करण्यात आली. या फवारणी उपक्रमाचा गावचे सरपंच संतोष पाटील,ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे,ग्रामसेवक प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थीत ग्रामस्थ उदय रहाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला‌.

या फवारणी साठी सांगुळवाडी कृषी काॅलेजचे अरुण पाटील सर यांची यंत्र सामग्री वापरली जात आहे.तर गावातील युवक अनिकेत हेळेकर,हरीचंद्र जंगम,गणेश जंगम हे ग्रामपंचायत कडून फवारणी करत आहेत. फवारणीसाठी यंत्रसामग्री व सहकार्य करणाऱ्या सर्वांना ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व श्री माऊली चॅरीटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क व हॅन्ड ग्लोज देण्यात आले. काळे यांनी याआधीही संपूर्ण गावातील सार्वजनिक ठिकाणी भाजपा युवा अध्यक्ष किशोर दळवी यांच्या माध्यमातून प्राणजीवन सहयोग संस्थेकडून फवारणी करून घेतल्या होत्या.
व आत्ता ग्रामपंचायत हद्दीत फवारणी अशी होईल

गाव सडूरे– चव्हाणवाडी,राणेवाडी,तुळशीचेभरड,बौद्धवाडी,रावराणेवाडी,मेजारीवाडी,गावठण खालचीवाडी,गावठण वरचीवाडी,हळदीचामाच,सोनधरणे,तांबळघाटी,रूंझुणे
गाव शिराळे-शिंदेवाडी,पाटीलवाडी,शेळकेवाडी,बोडेकरवाडी. अशी होणार असून फवारणी ट्रॅक्टर जिथे जिथे पोचेल तिथे पहिली फवारणी होईल.. ज्या घरा पर्यंत ट्रॅक्टर पोहोचणार नाही अशी जी घरे आहेत तिथे हात पंप वापरून फवारणी करण्यात येईल अशी माहिती ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी दिली.वाडी वस्तीवर ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 6 =