सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील अंकुर निवारा केंद्र येथील महिलांसाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनानिमित्त इलेक्ट्रीक गिझर भेट देण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे आदी उपस्थित होते.