You are currently viewing जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत मिलाग्रीसची हर्षिता देवरुखकर जिल्ह्यात प्रथम…

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत मिलाग्रीसची हर्षिता देवरुखकर जिल्ह्यात प्रथम…

सावंतवाडी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “स्वराज्य महोत्सव” या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थीनी हर्षिता संदिप देवरुखकर हिने इयत्ता ५ वी ते ७ वी या गटामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल तीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा