पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजू मसुरकर यांची निवेदनाद्वारे मागणी मागणी
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे एमआरआय मशिनरी तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन एमआरआय मशिनरी पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड या प्रायव्हेट कंपनीमार्फत स्वखर्चाने अशा मशिनरी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत लावून दिले जातात. पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत जागा उपलब्ध दिल्यानंतर शासनाच्या दरसूची प्रमाणे रुग्णांना ही सेवा उपलब्ध करून देतात.तसेच साठ वर्षे पूर्ण व त्यावरील तसेच 20000 च्या आतील तहसिलदार कडुन उत्पन्नाचा दाखला कुठल्याही वयोगटातील रुग्णांना तसेच अंध अपंग मूकबधिर कर्णबधिर मतिमंद अशा रुग्णांना मोफत लाभ दिला जातो यासाठी शासनाने कोणत्या प्रकारची निधी न देता ही सेवा अशा कंपनीमार्फत रुग्णांना उपलब्ध होते.
यासाठी शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास तसेच विद्युत दिल्यास अशी कंपनी महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच इतर राज्यांमध्ये ही सेवा अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिली आहे यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आरोग्य उपसंचालक डॉ भीमसेन कांबळे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी एकत्रित येऊन शासन निर्णय घेतल्यास गोरगरीब रुग्णांना या रुग्णसेवेचा लाभ मिळू शकतो अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब उपसंचालक कोल्हापूर डॉक्टर भीमसेन कांबळे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदन देऊन तसेच त्यांच्याशी बोलून मागणी केली आहे यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब उपसंचालक कोल्हापूर व सिव्हिल सर्जन यांनी सहमती दर्शवली व योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वासन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना दिले आहे.
तसेच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयामध्ये असे रुग्ण पाठवल्यास कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत तपासणी झाल्यानंतर व आर्थिक मोबदला मिळाल्यानंतर शासनाला योग्य तो आथिर्क मोबदला या कंपनीमार्फत दिला जातो असे मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना सांगितले आहे आणि तशा प्रकारची निवेदन सुद्धा देण्यात आले आहे यासाठी रुग्ण खाजगी रित्या सिटीस्कॅन व एम आर आय करून घेतल्यास सिटीस्कॅन करण्यासाठी साडेतीन हजार व एम आर आय चा रिपोर्ट करण्यासाठी सात ते आठ हजार एवढा मोठा आर्थिक फटका गोरगरीब रुग्णांवरती येऊन त्या व्यतिरिक्त खाजगी ॲम्बुलन्स चा भाडे खर्च रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवरती येतो.
यासाठी तातडीने गोरगरीब रुग्णांसाठी निर्णय घेतल्यास आपल्याला आशीर्वाद मिळून ईश्वरी सेवा केल्याप्रमाणे होईल असे निवेदन देण्यात आले अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
माझ्या या निवेदनाचा विचार होऊन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील रुग्ण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाभ घेऊ शकतात.
तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये मालवण व कुडाळ तालुक्यातील रुग्ण जिल्हा रुग्णालय मध्ये लाभ घेऊ शकतात तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये कणकवली तालुक्यातील तसेच देवगड व वैभववाडी तालुक्यातील रुग्ण कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये या सेवेचा लाभ घेऊ शकतात अशी माहिती सुद्धा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष मसूरकर यांनी दिली आहे.