तिसऱ्यांदा समन्स; देशद्रोहाचा गुन्हा दोघींवर दाखल…

तिसऱ्यांदा समन्स; देशद्रोहाचा गुन्हा दोघींवर दाखल…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवलं आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावत 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून कंगना आणि तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला आहे. कंगना रनौतला याआधी जेव्हा समन्स पाठवण्यात आलं होतं. तेव्हा तिने आपल्या भावाचं लग्न असल्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगितलं होतं.

 

चित्रपट दिग्दर्शक मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. ‘अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते,’ असे या याचिकेत म्हटले होते. साहिल अशरफ अली सय्यद नावाच्या एका व्यक्तीने कंगना विरोधात मुंबई वांद्रे कोर्टात गेले होते. या व्यक्तीने असा दावा केला होता की, कंगना रनौत आपल्या ट्वीट आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम असे दोन गट करण्याचा प्रयत्न करत आहे. महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद यांनी सेक्शन 121, 121A, 124A,‌ 153A, 153B, 295A, 298 आणि 505 अंतर्गत कंगनाविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

कंगनावर गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीने कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगना रनौतचे सर्व ट्वीट्स आणि व्हिडीओ सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने कलम 156 (3) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. एफआयआर दाखल केल्यानंतर कंगनाची चौकशी होणार आणि जर कंगना विरोधात पुरावे मिळाले तर मात्र कंगनाला अटकही केली जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा