You are currently viewing बांदा ते दोडामार्ग आयी मार्गावर साईडपट्टी धोकादायक!!

बांदा ते दोडामार्ग आयी मार्गावर साईडपट्टी धोकादायक!!

बांदा ते दोडामार्ग आयी मार्गावर साईडपट्टी धोकादायक!!

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील विकास कामे मार्गी लागत असली तरी रस्ता साईड पट्टी खोदाई गेल्या दोन वर्षांत जीओ लाईन साठी तिलारी घाटातून दोडामार्ग पर्यंत केली तर तिलारीचे पाणी मालवण नेण्यासाठी बांदा ते मणेरी रस्ता खोदाई केली आता आयी ते दोडामार्ग बांदा राज्यमार्ग पुर्णपणे अपघातास निमंत्रण ठरत आहे पैसे जमा केले साईड पट्टी तात्काळ दुरूस्त करणार असे वेळोवेळी आश्वासने देऊन फसवणुक केली आहे
एमएनजीएल गॅस कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा निष्काळजीपणा सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहे. दररोज एक दोन अपघात होत आहे अनेकांच्या गाड्यांचे लाखों रुपयाचे नुकसान होत आहे त्यांची भरपाईची मागणी जनतेतून होत आहे

गॅस कंपनीने पाईपलाईन नेण्यासाठी दोडामार्ग आयी रस्त्यावर बाजारपेठेत अगदी रस्त्यालगत खड्डा खोदला होता; त्यात काल एक डंपर रुतला आणि अपघातग्रस्त झाला होता तर आज मणेरी येथे साईड घेताना गाडी चिखलात रुतून बसली , सदर अपघात दोन्ही विभागाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे न निभावल्याने होत आहेत.याला कारणीभुत सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कंपनीने आपले काम पूर्ण झाल्यानंतर साईड पट्टी तात्काळ दुरूस्त करणार असल्याने दिलेला निधी गेला कुठे हा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे
काल दोडामार्ग आयी मार्गावर वसंत सभागृहापासून काही अंतरावर क्रशरवरील डस्ट घेऊन जाणारा डंपर समोरील वाहनाला बाजू देताना बाजूपट्टीवरच रुतला.मागची दोन्ही चाके अर्धी अधिक रुटली होती.खरं तर ती बाजूपट्टी आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी तिची खोदाई करण्यात आली.त्यानंतर त्याचे मजबुतीकरण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची होती; पण ती तशीच ठेवण्यात आल्याने त्यात डंपरची चाके फसली होती सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी पुन्हा अपघात घडू शकतात
याबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापनासाठी बनवलेल्या व्हाट्सअँप ग्रुपवर एमएनजीएलने खोदलेल्या बाजूपट्टीवर अपघात झाल्याची माहिती दररोज मिळत असून दुर्लक्ष केले जाते याकडे प्रशासनानं बांधकामच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेश देण्याची मागणी केलीजातआहे.

तालुक्यातील प्रमुख रस्त्यावरच दोन्ही विभागाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडू शकतात यापूर्वी माटणे येथे पाईपलाईनसाठीच्या चरात पडून निष्पाप गाईचा मृत्यू झाला होता.मणेरी येथे पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरामुळे मुख्य डांबरी रस्ता दबून रात्रीच्या वेळी दुचाकीचा अपघात झाला होता.त्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती.मणेरी जठार देवस्थानासमोर काजू कलमे वाहतूक करणारा मिनी टेम्पो गटारात रुतून अपघात झाला होता.असे अनेक अपघात घडतात तेव्हा याकडे लक्ष देण्याची गरज आहे
साटेली भेडशी रस्ता खोदाई मुळे तणाव निर्माण झाला होता याकडे पोलीस निरीक्षक व जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेत कार्यवाही केल्याने अनर्थ टळला आहे प्रभाग क्रमांक चार कडे जाणारा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यानंतर ग्रामस्थांशी तहसीलदार , पोलीस निरीक्षक यांनी चर्चा करून तोडगा काढला होता त्यात त्या अर्धवट सोडून गटार खोदाई केल्याने दुसऱ्याचा शेतात पाणी जाऊन संरक्षक भिंत कोसळली असती माञ या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ठिकठिकाणी वाद निर्माण होत आहे असा आरोप साटेली भेडशी उपसरपंच गणपत डागी यांनी केला आहे गावातील नळपाणी योजना पाईप लाईन खोदाई करताना फोडल्याने ती अद्याप दुरुस्त केली नसल्याने पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे नागरिकाचे हाल होत आहेत

भेडशी पुलही अपघातास निमंत्रण ठरत आहे
बहुचर्चित भेडशी पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असताना वाहतूक सूरु आहे साईडला
संरक्षक कठडे बांधले नसल्याने डाबराचे बॅरल ठेवण्यात आले आहे रात्रीच्या अंधारात या ठिकाणी अपघात घडू शकतात याकडे वारंवार पाठपुरावा मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने भेडशी परिसरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा