You are currently viewing ||श्री||

||श्री||

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम नृत्य नाटिका*

||श्री||
गुरु गजानन मनी वसावे
श्री गजाननाचे चरित्र गावे
सद्गुरूंचे गुणगान व्हावे
गुरूचरणासी भावे नमावे
गणी गण गणात बोते म्हणावे
गणी गण गणात बोते भजावे
गणी गण गणात बोते जपावे
गणी गण गणात बोते ध्यावे
श्री गजानन जयजयकारावे
जय गजानन जयजयकारावे

नमस्कार रसिक मंडळींनो श्री संत दासगणू महाराज लिखित
श्री गजानन विजय ग्रंथाचा आधार घेत
श्री गजानन महाराज
शेगाव चरित्रावर आधारित
कथा शेगावीच्या राणाची ही नृत्य
नाटिका सादर करीत आहोत.

आरंभी वंदन श्री गणेशाला
निर्विघ्नता द्यावी नृत्य नाटिकेला
दूजे वंदन. मॉ. सरस्वतीला
शब्द पुरवावे या लेखणीला
वंदन श्री गुरु गजाननाला
आशिर्वचन द्यावे तव मंजिरीला.

समर्थ सद्गुरू स्वामी माझा
राजाधिराज गुरु योगीराजा.

विदर्भ पंढरी,शेगांव ग्रामी
देविदास पातुरकर धामी
प्रगटले गजानन माध्यान्हीला
माघ वद्य सप्तमी दिनाला.
बाल रवी सम, लोभस सुंदर
तेजाळले,मुख ते मनोहर
जनपुष्करणी, ‘श्री पद्म’ फुलले
जगास या सुगंधे गंधाळले.
पत्रावळीत शिते वेचतांना
पाही बंकट दामोदर समर्थांना
अन्नपूर्ण ब्रह्म कथिले कृतीने
अलौकिक रत्न जाणिले द्वयीने.
बंकटलाल चित्ती विचलित
मन गुंतले समर्थ मूर्तीत
ध्यास भेटीचा लागे तळमळ
श्री. भेटले जाणूनी कळकळ
बंकट झाला अति आनंदीत
घरा आणले ‘श्रींना’ मिरवीत
उष्णोदकाचे स्नान सुगंधित
जरी पितांबर केला अर्पित.

पंचपक्वांनांचा केला हो थाट
बसण्यास दिला चंदनी पाट.
रांगोळी रेखीली धूप सुगंधी
गळा पुष्पहार, तो मधुगंधी
दूजी. द्वारका बंकट सदन
पूजन अर्चन आणि भजन
रोजच नाम संकीर्तन चाले
बंकट सदन दुमदुमले.
समर्थ सद्गुरू स्वामी माझा
राजाधिराज गुरु योगी राजा.

वैशाख मास प्रखर उन्हाळा
उन्हाच्या वाहती तप्त झळा
महाराज व्याकुळ तहानेने
पाणी मागितले.आर्जवाने
भास्कराने निधला हो नकार
समर्थ घर्मधारांनी बेजार
कोरड्या विहिरीत डोकावले
जगन्नियंतास की विनविले
समाज हिताचे भान राखत
जलमय केला कूप क्षणात
झणी त्यजिला संसार भास्कराने
शरण गेला अनन्य भावाने
बंकटाचा हिरवा गार मळा
मका कणसं खाण्याचा सोहळा
आगट्या. पेटविल्या एक साऱ्या
मोहोळ माशा पसरल्या सा-या
अनेकांची झाली की पळापळ
श्री ही ल्यायले माशांची वाकळं
सर्व रूपे त्या जगनियंताची
जाणूनी स्वस्थ मूर्ती समर्थांची
बंकट झाला दुःखीत चित्ती
प्रश्न पडे, फिरली कैसी मती?
काटे काढण्या सोनारा पाचारले
डोळ्यास परि ते नाही दिसले
समर्थांनी वायूलागी रोधले
सर्व काटे बाह्यांगावरी आले
आनंदले हो सारे भक्तजन
सोहळा मका सेवन संपन्न.

समर्थ सद्गुरू स्वामी माझा
राजाधिराज गुरु योगी राजा

हरी पाटील उर्मट गर्विष्ठ
कुस्ती खेळण्या आव्हानिले,तो शिष्ट
डावपेच केले निर्बळी व्यर्थ
गर्वहरण हरीचे केले सार्थ.
बंधु हरीचे धावले राहुळी
ऊस मोळी घेऊनिया देऊळी
वार उसाचे महाराजांवरी
परि वळ ना उठले अंगावरी
अवघी मोळी हातांनी पिळली
रस नव्हाळी सर्वांनी प्राशली
योग शक्तीचे सामर्थ्य दाविले
योगीराज हे नाव मिळविले
राष्ट्र सबल करण्यासाठी
योग शक्ती वापरा देशासाठी
योगशास्त्राचा प्रचार प्रसार
देशहिताचा जपावा विचार
समर्थ सद्गुरू स्वामी माझा
राजाधिराज गुरू योगीराजा

एक गोसावी नामे ब्रह्मगिरी
फिरत आले शेगाव नगरी
कृष्णा पाटलाच्या मळ्या भितरी
खावया मिळाली चून भाकरी
संध्येला एकादश स्कंद कथन
नैनं दहती पावक: निरूपण
अनुभवाचा अभाव संपूर्ण
कंटाळले सारे हो भक्तजन
ठिणगी पडली पलंगावरी
अग्निशिखा धावती वरवरी
भास्कर गोसाव्याचा कर धरी
सिद्ध करा कथन खरोखरी
घाबरला ब्रह्मगिरी अंतरी
शरण तो गुरुचरणांवरी
उपदेशिले गोसाव्यास अखेरी
न व्हावे पोटभऱ्या खरोखरी
श्री आणि बंकटादी भक्त जन
नर्मदा स्नानास. केले प्रयाण
ओंकारेश्वरास फुटली नौका
नर्मदा वाचवी क्षणात एका
लोकमान्य टिळकांच्या सभेत
समर्थ बसले, आले वेळेत
लोकमान्यांना आशीर्वाद दिला
भाकरीचा प्रसाद पाठविला
चुकली गाडी कवर सुताची
आर्त हाक ऐकली त्र्यंबकाची
राहिले महाराज उपोषित
पाहुनी त्र्यंबक कवर हर्षित
भक्षिली चून भाकरी भक्ताची
फळली भक्ती कवर सुताची
समर्थ सद्गुरू स्वामी माझा
राजाधिराज गुरु योगी राजा

पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन
मागणी राहण्या विठ्ठल चरण
भाद्रपद शुद्ध पंचमी दिन
समाधिस्त हो गुरु गजानन
रात्री रथयात्रा चाले मार्गावर
रेखिल्या रांगोळ्या रंगीत सुंदर
अपार भक्त मेळा जमला
भजन सुस्वरे दिंड्या चालल्या
रात्रभर चाले गुरुचा सोहळा
शेगावी भक्तजनी मोद हा आगळा
उत्तराभिमुख मूर्ती साजरी
अभिषेक केला असे त्यावरी
बंद केले द्वार लावूनी शिळा
संपन्नला हो समाधी सोहळा
‘मी आहे येथेच ‘आश्वासिले श्रींनी
अनुभव घेतला हो अनेकांनी
नवाक्षरी मंत्र भक्तांना दिला
गण गण गणात बोते बोला
समर्थ सद्गुरू स्वामी माझा
राजाधिराज गुरु योगी राजा

अनंत कोटी ब्रम्हांडनायक
महाराजाधिराज गुरु योगीराज
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज
की जयsssss.

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर ©️®️

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा