You are currently viewing जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, किल्ले व स्मारके पर्यटकांसाठी खुली….

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, किल्ले व स्मारके पर्यटकांसाठी खुली….

सिंधुदुर्गनगरी

मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटक व नागरिकांसाठी खिली करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. एतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश देताना कोविड – 19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या ठिकाणी आरोग्य  आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या द्वारे देण्यात आलेल्या व सार्वजनिक आरोग्य विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देणअयात आलेल्या मानक कार्यप्रणालीचा अवलंब करणेही बंधनकारक असणरा आहे. तसेच या ठिकाणी मास्क चा वापर करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, हात वारंवार धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

   जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 व 30 तसेच कोविड – 19 उपाययोजना नियम 2020 मधईल नियम 10 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सदर आदेश दिले आहेत. सदर आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदार शिक्षेस पात्र असेल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =