You are currently viewing त्रिंबक ग्रामपंचायतीत शवपेटीचे लोकार्पण

त्रिंबक ग्रामपंचायतीत शवपेटीचे लोकार्पण

मालवण :

 

त्रिंबक गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली मालवण गाठावे लागत होते ही गरज ओळखून ग्रामविकास समिती त्रिंबक यांनी निधी गोळा करत त्रिंबक गावासाठी शवपेटी खरेदी करत तीचे लोकार्पण त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर आणि जेष्ठनागरिक दत्ताजी पवार यांच्या हस्ते त्रिंबक ग्रामपंचायत येथे करण्यात आले.

या वेळी उपसरपंच श्री.आशिष बागवे, ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण, डॉ.सिद्धेश सकपाळ, श्री.सुरेंद्र सकपाळ, पोलीस पाटील सीताराम सकपाळ, प्रा.आरोग्य केंद्र कर्मचारी श्री.यादव, कासले मॅडम, पवार मॅडम, राकेश गावडे, अर्चित लेले, राजन त्रिंबककर, रामदास पवार, अनिल कदम, अनिल सावंत, संतोष घाडीगांवकर, मनीष चव्हाण, सौरभ शेडगे, सुधीर त्रिंबककर, सुभाष मेस्त्री आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 11 =