You are currently viewing संघटना वाढीवर भर द्या पुढील काळ हा काँग्रेसचाच- शशांक बावचकर

संघटना वाढीवर भर द्या पुढील काळ हा काँग्रेसचाच- शशांक बावचकर

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा ओरोस येथे पक्ष कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बोलताना शशांक बावचकर म्हणाले आज जे देशात आणि महाराष्ट्रात चालले आहे त्याला जनता कंटाळली आहे. गेल्या नऊ वर्षांत केंद्रतील मोदी सरकार हे पुर्णपणे अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, बेरोजगारीच्या समस्येने तरूण त्रस्त आहेत. गरीब अजून गरीब होत आहे आणि मोदींचे काही मोजके उद्योगपती मित्र प्रचंड श्रीमंत होत आहेत.काँग्रेस सरकारच्या काळात निर्माण केलेल्या नवरत्न कंपन्या कवडीमोलाने निवडक उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम मोदी सरकार करत आहे. महाराष्ट्रात इडीची,इन्कम टॅक्स,सीबीआयची भीती दाखवून व खोक्यांचे आमिष देऊन पक्षात फुट पाडण्याचे काम भाजप करत आहे. या भाजपच्या कुकर्माना देशातील आणि राज्यातील जनता कंटाळली आहे.केंद्रतील मोदी सरकार व इडीचे महाराष्ट्रातील अनैतिक सरकार यांच्याकडे जनतेला सांगण्यासारखी कोणतीही केलेली कामे नाहीत म्हणून धर्मा धर्मात जाती जातीत भांडणे लावून मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. परंतू जनतेला हे कळून चुकले आहे की सर्वसामान्यांच्या मनातील सरकार हे काँग्रेसच देऊ शकते. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देशातील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.त्यामुळे पुढील काळ हा काँग्रेसचा असेल म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे जो विश्वास राहुल गांधी यांनी देशातील जनतेच्या मनामध्ये निर्माण केला आहे त्याला बळ देण्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी जनते पर्यंत पोहोचले पाहिजे. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

या सभेला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख,माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत,कार्याध्यक्ष विलास गावडे, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा आफ्रिन करोल, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर,महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी,ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष गुलजार काझी,जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, विजय प्रभू, सरचिटणीस चंद्रशेखर जोशी,प्रवीण वरुणकर, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक,कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर,वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर,रवींद्र म्हापसेकर, उल्हास मणचेकर,चंद्रकांत राणे,सुधीर मल्हार, सिद्धेश परब,आनंद पवार, भालचंद्र जाधव,विजय खाडे,उदय फणसेकर,वसिम काझी,वसंत नाटेकर,महेश तेली,संजय सावंत, अक्षय घाडीगावकर,निलेश मालंडकर,अमृता मालंडकर, संजना चव्हाण, प्रदीपकुमार जाधव, हेमंत माळकर,महेंद्र मांजरेकर,महेश डिचोलकर, स्मीता वागळे,अमिदी मेस्त्री,मीनाताई बोडके,पंढरी पांगम, सत्यवान रेवडेकर,शुभांगी काळसेकर, सोनल सावंत,सभाष दळवी,मनोहर मोर्ये, अमित मांडवकर,प्रकाश पडवळ,अभिजीत राणे,मयुर आरोलकर,अनिल डेगवेकर, आनंद परूळेकर,महेश परब,अभय मालवणकर, समीर वंजारी,नारायण पिंगळे,विनायक म्हापणकर, विलास वेंगुर्लेकर, सूर्यकांत आचरेकर,कल्पेश पिंगळे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =