You are currently viewing सातार्डा येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

सातार्डा येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

सातार्डा येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

सातार्डा

सातार्डा – भटवाडी येथील राजेश रवींद्र भगत (२८) या युवकाने रहात्या घराच्या खोलीत कंबरबेल्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. मात्र, त्याने आत्महत्या का केली याबाबत माहिती प्राप्त झाली नाही.
राजेश हा पर्वरी – गोवा येथील मॉलमध्ये वाहतूक व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. काळोबा स्पोर्ट क्लबचा तो अष्टपैलू, दर्जेदार क्रिकेटपटू होता. रवळनाथ क्रिकेट क्लब, आर टी एम स्पोर्ट क्लब, रायाचेपेड , महापुरुष स्पोर्ट क्लब, तरचावाडा या क्रिकेट क्लबसाठी राजेश भगत भरीव योगदान दिले होते. भटवाडीतील विविध सामाजिक कामांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याच्या आकस्मिक निधनामुळे गावातून हळहळ व्येक्त केली जात आहे. मृत राजेशच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 2 =