You are currently viewing काऊ चिऊ

काऊ चिऊ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*

 

*काऊ चिऊ*

 

चिमणी मनी वरमली का वागले अशी मी?

घरट्यातल्या उबीच्या पडले कशी फसी मी?

 

तो कावळा बिचारा याचक बनून आला,

ना दार काढले की केली न चौकशी मी!

 

शेजारधर्म काही मज पाळता न आला,

माणूस वागतोना का वागले तशी मी?

 

गेला भिजून पुरता थिजला तसाच काऊ,

येतो समोर तेंव्हा नसतेच फारशी मी!

 

मागेपुढे असे तो ताई म्हणायचा मज,

ठरले कथेत अमुच्या खलनायिका जशी मी!

 

जयराम धोंगडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 2 =