You are currently viewing साबाजी कुबल यांचे अल्प आजाराने निधन

साबाजी कुबल यांचे अल्प आजाराने निधन

साबाजी कुबल यांचे अल्प आजाराने निधन

मालवण –

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा पिरावाडी येथील कुबल कुटुंब विकास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य साबाजी कुसाजी कुबल यांचे दि. ६ जुलै २०२३ रोजी वरळी, मुंबई येथे राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. लोभसवाण्या स्वभावाचे कुबल यांनी वरळी परिसरात सर्वांना आपलेसे केले होते. त्यांनी शिववैभव मध्यवर्ती ग्राहक भंडारच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य केले होते. त्यांनी कित्येक वर्षे विभागप्रमुख म्हणून सदर संस्थेची धुरा सांभाळली होती. तसेच ते परोपकारी वृत्तीचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्ण, कुसाजी, अशोक दोन मुलगे, केशव, नीलकंठ दोन भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आचरा पिरावाडी आणि वरळी मुंबई येथे शोक व्यक्त करून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या मृतदेहावर व हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + nineteen =